‘वंचित’कडून कुमुदिनी चव्हान यांचा उमेदवारी अर्ज दाखल
| दिघी | वार्ताहर |
रायगड लोकसभेत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हान यांनी शुक्रवारी (दि. 19) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला.
पेशाने शिक्षिका असलेल्या कुमुदिनी चव्हान आता लोकसभेच्या रिंगणात उतरल्या असून, आपली पूर्ण ताकद त्या या निवडणुकीत लावणार आहेत. रायगडच्या लोकसभा लढतीत खरी लढत ही महाविकास आघाडीचे अनंत गीते आणि महायुतीचे सुनील तटकरे यांच्यात होणार असली तरी वंचितने मात्र आपला उमेदवार लोकसभेचा रिंगणात उतरवला आहे.