खारेपाटात सवाई पाटील यांनी केला प्रचाराचा शुभारंभ

| खारेपाट | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील माणकुले ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शेकापचे युवा नेते सवाई पाटील यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. विजय आपलाच होणार असा विश्वास सवाई पाटील यांनी व्यक्त करुन उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

सरपंच पदाचे उमेदवार जागृती जगन्नाथ पाटील व प्रभाग क्र.1 मध्ये सदस्य पदाचे उमेदवार म्हात्रे जयवंत जगन्नाथ, पाटील हर्षल रविंद्र, पाटील रेश्मा हर्षल, प्रभाग क्र.2 चे उमेदवार पाटील अशोक बबन, पाटील सेजल मिलन, पाटील सारीका मिलन व प्रभाग क्र.3 चे उमेदवार पाटील प्रल्हाद मारुती, म्हात्रे दिप्ती राजकुमार, म्हात्रे संगिता महेंद्र यांचा समावेश आहे. प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी येथील बहिरीदेव मंदिरात मोठ्या संख्येने इंडिया आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी राजिप सदस्या भावना पाटील, खारेपाटातील नेते जगन्नाथ म्हात्रे, माजी पंचायत समिती उपसभापती प्रकाश पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव ॲड. प्रविण ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, कोकण विभागीय पदाधिकारी सरोज डाकी, काँग्रेस विभागीय अध्यक्ष विजय पाटील, जिल्हा काँग्रेस वरीष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल थळे, तालुका काँग्रेस अध्यक्ष भास्करराव चव्हाण, जिल्हा चिटणीस प्रभाकर राणे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version