। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी नजीकच्या कर्नाळा कल्हे फाटा येथे मुंबई गोवा रस्त्यावर भाजीविक्री करणार्या 45 आदीवासी ठाकूरजमातीच्या महिलांना अर्चंना ट्रस्टच्यावतीने सौ.सिंघानिया,प्रभा पटोडिया, कविता गर्गं यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकी एक तराजू,एक टोपली तसेच शिवणकाम शिकलेल्या पाच आदीवासी युवतींना शिलाईं मशिनचे मोफत वाटप करण्यात आले.
आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी वाघ,सोलसकर यांनी भाजीविक्रेत्या आदीवासी महिलांना मदत म्हणून शासनाकडून प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.आदीवासी महिलांसाठी राबविलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करुन रसायनी पाताळगंगा परीसरासह विविध ठिकाणच्या आदीवासी वाड्यांत आदीवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी अर्चना ट्रस्ट महत्वाचे समाजकार्य करीत असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत,मनिषा मोरे,आदीवासी प्रकल्प कार्यालय प्रतिनिधी वाघ,सोलस्कर,साजीर दळवी,संतोष पाटील, दशरथ गायकर,सुरेश रासम,गिता भगत,संतोष ठाकूर,वैशाली पवार,दिनेश पाटील, राजेंद्र म्हात्रे,शेखर कानाडे,जीवन टाकले,कमळाकर टाकले,संजय म्हात्रे,बाळशेट पाटील, रामदास गुरव,निलेश पाटील, जयेश म्हात्रे, सुरेखा पाटील आदी उपस्थित होते.