आयएनएस विक्रांतमध्ये घोटाळा

सोमय्यांवर गुन्हा,शिवसेना आक्रमक
| मुंबई | प्रतिनिधी |
आयएनस विक्रांतमध्ये घोटाळा झाल्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून,यावरुन शिवसेनेने सोमय्यांवर जोरदार टीकास्त्र करीत कारवाई करण्याची मागणी केली.

खा.संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांची पाठराखण केल्याबद्दल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. ईडी जर भाजपाची बटीक नसेल तर याप्रकरणी कारवाई करावी असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं असून हा मनी लाँड्रिंगचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान,गुरुवारी खा.राऊत यांचे शिवसेनेच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

Exit mobile version