नविन पनवेलमध्ये बऱ्याच भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई

| नविन पनवेल | वार्ताहार |

सेक्टर 3, 4, 8, 9,10 परिसरात जागोजागी महानगर कंपनीचे गस पाईप लाईन टाकण्याची कामे सुरू आहे. या खोद कामे करताना पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यांकडे कंत्राटदाराकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे या परिसरात भूमीगत रस्त्याखालून जाणाऱ्या जलवाहिन्या फुटून हजारो लिटर पाणी वाया जाण्याच्या घटना या परिसरात नेहमीच घडत असतात. गेल्या दहा महिन्यापूर्वी नविन पनवेल येथिल डीएव्ही शाळेसमोरच्या रस्त्यावर सिध्द विनायक सोसायटीसमोर रस्त्याचे खोदकाम करताना जलवाहिनी फूटून हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली.आज पुन्हा सेक्टर 3 येथिल निल रेसिडेंसी सोसायटी समोर जलवाहिनी फूटली असून हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे यामुळे येथिल नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.गेल्या अनेक दिवसांपासून नवीन पनवेलचा पाणीप्रश्न जटिल झाला असून पाण्यावाचून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.पाणीटंचाई प्रश्नी गेल्या आठ दिवसापूर्वी येथिल नागरिकांनी नवीन पनवेल सिडको कार्यालयाला धडक दिली होती.

नविन पनवेलमध्ये बऱ्याच भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे . दुसरीकडे सिडको प्रशासनाच्या व महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे पाइपलाइन फुटून हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे.यामुळे येथिल नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे .

Exit mobile version