पंडीत पाटील यांची विशेष उपस्थिती
। बोर्लीपंचयतन । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथे संपन्न झालेल्या कबड्डी स्पर्धेत खुशबू आईस्क्रीम, अलिबाग संघाची सरशी झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धा कार्यक्रमास माजी आम. पंडित पाटील, त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील यांनी उपस्थित राहून सामन्यांपूर्वी उपस्थित संघांना संबोधित करत त्यांचे मनोबल वाढविले. स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त जय बाबदेव क्रीडा मंडळ, गोंडघर आणि कै. रूपम पायेर स्मृती चषक यांच्या वतीन कब्बडीचा महासंग्राम या चौरंगी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रीमियम ताडवागले, अलिबाग संघाने द्वितीय क्रमांक, साहिल स्पोर्ट क्लब, पेण संघाने तृतीय क्रमांक तर पाटीलवाडी गोंडघर संघाने चौथ्या क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच लहू तुरे यांच्या हस्ते करण्यात आले तर बक्षीस वितरण दिनेश बामणे, अन्सार चौगुले, रफिक उंड्रे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पण कोव्हिड विषयक आरोग्यनियमांचे पालन करून संपन्न झाली.