जेएसएमतर्फे शिष्यवृत्तीसंदर्भात आवाहन

। अलिबाग । शहर वार्ताहर ।
शासनाकडून अनुसुचित जाती तथा जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देण्यात येणारी मदत प्रत्येक महाविद्यालयाकडे जमा करण्यात आली असून, जे.एस.एम.महाविद्यालयातर्फे शैक्षणिक वर्ष 2015 ते 2020 मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी विहीत प्रक्रियेद्वारे या रक्कमेचे धनादेश घेऊन जावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाविद्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षातील एससी, एसटी, एनटी, ओबीसी आणि एसबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती यावर्षी धनादेशाच्या आधारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2015-16 ते 2019-20 पर्यंत जे विद्यार्थी शिकत होते आणि महत्त्वाचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप, फ्रिशिप शिष्यवृत्ती याकरिता फॉर्म भरले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी येत्या 7 दिवसात महाविद्यालयाकडून या शिष्यवृत्तीचे धनादेश ओळख पटवून घेऊन जाण्याची सूचना महाविद्यालयाने केली आहे. यासाठी महाविद्यालयीन ओळखपत्र किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा ग्राह्य असणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन अधिकारी साळसकर यांचेसह संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.

Exit mobile version