वरसोली येथे स्कुल चलो अभियान

। सोगांव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागात गेले काही दिवस दी लाईफ फाऊंडेशन द्वारा आदिवासी वाड्यांवर व गावाठिकाणी स्कुल चलो अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाला आदिवासी बांधव व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत आहेत. वरसोली कोळीवाडा आणि बुरुमखाण आदिवासीवाडी येथे स्कूल चलो प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. सर्व मुले-मुली शाळेत परतावीत आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावे हा प्रभातफेरी मागचा उद्देश आहे. यावेळी बुरुमखाण आदिवासी वाडीवरील अनुपस्थित राहणार्‍या विद्यार्थ्यांना दी लाईफ फाउंडेशन चे कार्यकर्ते आणि शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या घरी जाऊन शाळेत घेऊन आले, तसेच त्यांना त्यांच्या मनामध्ये शाळेत पुन्हा आवडीने येण्यासाठी उत्साह भरण्यात आले. तेव्हा विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत शाळेत येण्याबाबत उत्साह दर्शविला.


या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशोदा भाटकर, रा.जि.प. शाळेचे मुख्याध्यापक विकास पाटील, उपशिक्षिका विलासिनी पडवळ, विषय शिक्षिका स्मिता भंडारे, उपशिक्षिका जिज्ञासा तांडेल, प्रणाली गुरव, अंगणवाडी सेविका आशा गडदे, वैशाली दवटे, दिप्ती पाटील, विभूती पाटील, मदतनीस ज्योती वर्तक, उज्वला वर्तक आणि पालकवर्ग उपस्थित होते.

Exit mobile version