उद्या शाळांना सुट्टी

रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रायगड । जिल्हा प्रतिनिधी


रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे . त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग पनवेल उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, पोलादपूर या सात तालुक्यातील सर्व अंगणवाडी माध्यमिक प्राथमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांना गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे .रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा आदेश जारी केला आहे .


गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर वाढत आहे. जिल्ह्यामध्ये गुरुवारी (दि. 2) अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला.वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याने मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . नागरी सुरक्षेच्या दृष्टीने रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यातील माध्यमिक प्राथमिक शाळांसह अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. मात्र या कालावधीत सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी असे लेखी पत्र काढण्यात आले आहे .

Exit mobile version