| रायगड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रायगड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड व जंप रोप असोसिएशन ऑफ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय शालेय जंपरोप स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई उलवे येथे प्रथमच आयोजित करण्यात आल्याने जिल्हाभरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पियुष म्हात्रे, रोशनी डिमेलो, प्रशांत पारगावकर विदेश मोरे, ललिता सिंग, वैभव पेटकर, प्रणित महाडी, मनीषा घोलप, करण बागल, दीपक बागल आदी मान्यवर उपस्थित होते. ही एकदिवसीय स्पर्धा सेक्टर 19 येथील ब्राईट फ्युचर हायस्कूलच्या प्रांगणात पार पडली. रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमधील अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अनेकांसाठी जंपरोप हा स्वतंत्र क्रीडा प्रकार असल्याची ही पहिलीच ओळख ठरली.
स्पर्धेपूर्वी प्रशांत पारगावकर यांनी खेळाडूंना जंपरोप खेळाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच स्पर्धेच्या तांत्रिक बाबी त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. त्यांच्या प्रोत्साहनामुळे खेळाडू व मार्गदर्शकांनी आभार व्यक्त केले. स्पर्धेच्या आयोजनात प्रितेश पाटील, निकिता खारकर, रोशनी डिमेलो, अजय काकडे व सुवर्णा काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत या खेळाच्या विकासासाठी नेहमी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. ब्राईट फ्युचर स्कूलचे ट्रस्टी म्हात्रे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच फेन्सिंग असोसिएशन ऑफ रायगडचे सचिव मिलिंद ठाकूर यांनी जंपरोप खेळाचे भविष्य उज्वल असल्याचे सांगत रायगड जिल्हा व मुंबई विभागात या खेळासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर मिरकुटे, मनीषा मिरकुटे, रिचल डिमेलो पाटील आदींनी परिश्रम घेतले. संपूर्ण स्पर्धेसाठी क्रीडा अधिकारी देविदास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सायंकाळी उशिरा या स्पर्धेचा समारोप करण्यात आला.







