| पेण | प्रतिनिधी |
शेडाशी मालदेव शाळेत आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या आठवडा बाजारामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. ज्यामधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव मिळाला. तसेच, नफा-तोटा या संकल्पना वृद्धिंगत झाल्या. या आठवडा बाजारामध्ये पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 15-16 दुकाने विद्यार्थ्यांनी लावली होती. त्यामध्ये पालेभाज्या, शैक्षणिक साहित्य, खाऊच्या दुकानांमध्ये इडली, वडापाव, घरगुती पदार्थ अशा जिन्नसी ठेवण्यात आल्या होत्या. शाळेतील 30 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन ग्रामस्थांना आठवडा बाजाराचा अनुभव दिला. या आठवडा बाजारासाठी उपस्थित मान्यवर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सचिन सावंत, केंद्र प्रमुख दत्तात्रेय कोठेकर, मुख्याध्यापक विजय मिस्त्री, सहशिक्षक ज्ञानेश्वर जेधे पालक वर्ग आणि ज्येष्ठ मान्यवर यांची उपस्थिती मोलाची होती.






