आयएसओ मानांकन प्राप्त डिजिटल आदर्श शाळा पेझारीतर्फे दप्तर विना शाळा


। अलिबाग । वार्ताहर ।
आयएसओ मानांकन प्राप्त डिजिटल आदर्श शाळा पेझारी येथे आजादी का अमृत महोत्सव या संकल्पने अंतर्गत रायगड जिल्हा परिषद अलिबाग तर्फे दप्तर विना शाळा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आजचा विषय परसबाग म्हणजेच घराच्या व शाळेच्या परिसरातील बाग, रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोअर यांच्या माध्यमातून शाळेच्या परिसरात परसबागेत वेगवेगळ्या प्रकारची फळे, तसेच वांगी, टोमॅटो भाज्या व इतर पदार्थ मिरची, चहापत्ती, ओवा, इत्यादी तसेच गुलाब, जास्वंदी, मोगरा,इत्यादी फुल झाडांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
डॉक्टर राजेंद्र चांदोरकर, यांनी यावेळी सांगितले कि लहान मुलांमध्ये अनेक कलागुण असतात व त्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्त या कलागुणांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाल्यास त्या गुणांचा चांगल्या प्रकारे विकास होतो. याच बरोबर आहार व आरोग्याविषयी ईतरही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
डॉक्टर राजेंद्र चांदोरकर यांनी शाळा व शालेय परिसर तसेच आल्हाददायक व उत्साही वातावरण पाहून आनंद व्यक्त केला. एवढी सुंदर शाळा पाहून मला खूप आनंद झाला आहे असे उदगार त्यांनी काढले. यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ दरवर्षी शाळेला 10,000 हजार रुपयांची देणगी देण्याचा संकल्प यावेळी त्यांनी जाहीर केला.
दिलीप भड, माधुरी म्हात्रे याउपस्थितांचे स्वागत सुरेश म्हात्रे, आरती थळे यांनी केले. प्रास्ताविक नितीश पाटील यांनी केले. कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोअर, डॉक्टर निलेश म्हात्रे, कुमार जोगळेकर, जनार्दन चापडे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version