। माणगाव । प्रतिनिधी ।
तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा दहिवली येथे बुधवारी (दि.28) राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न झाला. प्रथम विज्ञान दिन साजरा करण्यामागची पार्श्वभूमी मुलांना सांगितली. त्यानंतर शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांविषयाच्या पुस्तकांचे वाचन केले.
शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीमधील सर्व विद्यार्थ्यांच्या नवनवीन प्रयोग साहित्यासह प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनास चेरफळे साहेब, नरेश सत्वे, शैलेश करकरे, बाबु लाखाडे, सुरेश करकरे, अशोक करकरे, तुकाराम लाखाडे, शिवराम लाखाडे, राजेंद्र दाभणे, गणपत सत्वे, जयेंद्र सत्वे या ग्रामस्थांनी प्रदर्शनास भेट दिली.