विद्या विकास शाळेत विज्ञान प्रदर्शन

। नेरळ । वार्ताहर ।

विद्या विकास एज्युकेशन सोसायटी विक्रोळी संचलित प्राथमिक शाळा वांगणी येथे वर्षभर नवनवीन उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्व व विद्यार्थीमधील सर्जनशीलतेला, वैज्ञानिक शोध वृत्तीला वाव मिळावा. त्यांना तांत्रिक शिक्षण मिळावे असे अनेक हेतू लक्षात घेऊन राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित बाल वैज्ञानिक प्रदर्शन हा उपक्रम राबविला गेला. विद्या विकास शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक तत्वाचा वापर करून विविध विषयावर प्रकल्प सादर केले. प्रदर्शला मिलिंदकूमार सूर्यवंशी, बाळकृष्ण ठाकरे, संजय देशपांडे, रेश्मा मोरे, प.म.राऊत, विनय राऊत, माधवी नांदोसकर आदि उपस्थित होते.

Exit mobile version