विज्ञानाच्या जत्रेत विज्ञानाची नवकल्पना मांडणारे मॉडेल
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद शाळा नवगाव येथे (दि.16) अगस्त्य इंटरनॅशनल फाऊंडेशन व राजिप शाळा नवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान जत्रा/नवकल्पना (इनोव्हेशन) जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या उपक्रमात अनेक वैज्ञानिक मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ बनवून त्यांचे स्टॉल लावले होते. याद्वारे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान आणि व्यावसायिक ज्ञान याबद्दल माहिती करुन देणे हा मुख्य उद्देश होता, अशी माहिती अगस्त्य फाऊंडेशनचे रायगड विभाग सदस्य रोहन म्हात्रे यांनी दिली. या कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच सदस्य तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.