शास्त्रज्ञांची शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

कीड रोगाबाबत मार्गदर्शन; कृषी विभागाचा पुढाकार


| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे भातशेती, भाजीपाला आणि फळबाग पिकामध्ये कीड रोग यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी कर्जत कृषी विभाग यांच्या माध्यमातून शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.

तालुक्यात भातपीक तसेच भाजीपाला शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकावर पावसाळ्यात कमी-अधिक प्रमाणात पर्जन्य झाल्यास त्याचा फटका पिकांना बसत असतो.त्यामुळे हातात आलेले पीक वाया जाण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन आयत्या वेळी शेतकऱ्यांवर कीड रोगामुळे नुकसान होऊ नये यासाठी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळावे यासाठी कर्जत कृषी विभाग यांच्या वतीने पुढाकार घेऊन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. योवळी गौळवाडी, पाली, भोईरवाडी आणि खांडपे येथे प्रत्यक्ष शेती क्षेत्रावर भेटी देण्यात आल्या. शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी त्या क्षेत्र भेटीमध्ये किड आणि रोग यांचा फैलाव झाल्यास कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यांची माहिती दिली.

कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी शास्त्रज्ञ आणि कीटक शास्त्रज्ञ डॉ. वैशाली सावंत यांच्यासह तालुका कृषी अधिकारी कर्जत अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी, कृषी पर्यवेक्षक मंगेश गलांडे, सुदर्शन वायसे, किरण गंगावणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहाय्यक कल्याणी कोरफड, दत्तू देवकाते यांनी या शास्त्रज्ञ आणि शेतकरी संवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. या शेतकरी शास्त्रज्ञ संवादाने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version