| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
वेगाने स्कुटी चालवून ती स्लिप झाल्याने चंदन डोरा दासरी यांचा जखमी होऊन मृत्यू झाला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदई येथील अनंत सफायर सोसायटीत राहणारे दासरी हे खांदा येथून आदई येथे घरी येत होते. सेक्टर 7, नवीन पनवेलला ब्रिज संपतो त्या ठिकाणी गुरुद्वारा जवळ रस्त्यावर मोटरसायकल वरून पडून त्यांचा अपघात झाला. ते त्यांची एक्सेस मोटरसायकल (एमएस 46 बीजे 8901) या स्कुटीने ब्रिजच्या उतार्यावर वेगाने येत होते. गुरुद्वारा जवळ त्यांची स्कुटी स्लिप झाली व वाहनाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. ते खाली पडले व त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापती झाल्या. त्यांना पॅनासिया हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता ते मृत्युमुखी पडले.