ट्रेलरची स्कुटीला धडक; चालकाचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

मुंब्रा महामार्गावरील कळंबोली पोलीस ठाण्याशेजारील सेवा रस्त्यावर एका ट्रेलरने स्कुटीला मागून धडक दिली. यात स्कुटीचालकाचा जागीच मृत्यू झाला.

कळंबोली गावातील शर्मा बेकरीशेजारी राहणारा अनिकेत जाधव हा बीमा कॉम्प्लेक्स येथे कामासाठी स्कुटीवरून जात होता. दरम्यान तो कळंबोली पोलीस ठाण्याशेजारील सेवा रस्त्यावर आला असता मागून आलेल्या ट्रेलरने अनिकेतच्या स्कुटीला धडक दिली. या धडकेत अनिकेत खाली कोसळल्याने त्याच्या अंगावरून ट्रेलरचे चाक गेले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात ट्रेलरचालक शिवप्रकाश वर्मा (23) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती शेळके करीत आहेत.

Exit mobile version