अज्ञात वाहनाच्या धडकेने स्कुटी चालकाचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

तालुक्यातील भोकरपाडा जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जाणार्‍या एका स्कुटीवरील चालकास अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

भूषण राजाराम कांबळे (39) असे या मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. हे त्याच्या ताब्यातील स्कूटी क्र.एम एच 46 बी.एस 1060 ने जुन्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने चौककडून पनवेलकडे जात असताना त्यास कोणत्यातरी अज्ञात वाहनाच्या चालकाने त्याचे ताब्यातील अज्ञात वाहन हयगयीने, भरधाव वेगाने चालवून पाठीमागून धडक देऊन त्याचे मृत्यूस कारणीभूत झाला, तसेच त्यास कोणतीही वैद्यकीय मदत न देता व पोलिसांना कोणतीही खबर न देता पळून गेला म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version