चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने गणवेशाची भेट
| अलिबाग | प्रतिनिधी |
शिस्त, सेवा आणि संघाची भावना निर्माण करणारे युनिट म्हणून स्काऊट गाऊड गाईडकडे पाहिले जाते. नागावमधील हायस्कूलमध्ये हे युनिट सूरू करण्यात आले आहे. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी सामाजिक बांधीलकी जपत या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्काऊड गणवेश मोफत भेट दिले. या गणवेशाचे वाटप गुरुवारी (दि.14) शाळेच्या सभागृहात करण्यात आले. स्काऊड गाईडचे गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
यावेळी नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, उपसरपंच सुरेंद्र नागलेकर, संस्थेचे सभासद विश्वजीत जोशी, कृषीवलच्या कार्यकारी संपादक माधवी सावंत, पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, मंगेश नाईक, शुभम नाईक, निलेश नाईक, शाळेतील शिक्षक जान्हवी बनकर, चंद्रकांत गिरी, मोहन पाटील, मंजुषा पाटील, सुप्रिया पाटील, वर्षा पाटील, तनिष्का नाईक आदी मान्यवरांसह शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संस्थेचे सभासद विश्वजीत जोशी यांनी स्काऊड गाईडचे महत्त्व सांगत गावाचे, देशाचे नावलौकिक करण्याचे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. यावेळी कृषीवलच्या कार्यकारी संपादक माधवी सावंत व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
चित्रलेखा पाटील यांचे कार्य कौतुकास्पद : हर्षदा मयेकर
शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने नागाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी स्काऊटचे गणवेश उपलब्ध झाले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना स्काऊटचे धडे मिळणार आहेत. त्याचा आनंद आहे. शहीद निलेश तुणतुणे यांच्या स्मृती दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी नागाव हायस्कूलमध्ये एक चांगले युनिट निर्माण व्हावे, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजसेवेचा ध्यास असलेल्या शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांचे कार्य खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी केले.
चित्रलेखा पाटील यांचा आदर्श घेण्यासारखा : जान्हवी बनकर
स्काऊड हा शिस्तीचा विषय आहे. आपल्या शाळेतील मुलांना स्काऊट गाईडचे धडे दिले जाणार आहे. हा एक विषय शाळेमध्ये ठेवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना स्काऊटचे गणवेश देण्यासाठी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेतला. एका दिवसातच नागाव शाळेतील विद्यार्थ्यांना स्काऊडचे गणवेश उपलब्ध करून दिले. त्यामुळे आता शाळेच्या मैदानात स्काऊटद्वारे संचलन होताना दिसणार आहे. शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या चित्रलेखा पाटील यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. त्याची जाण ठेवून विद्यार्थ्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने स्काऊटचे धडे घेऊन एक शिस्तबद्ध नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शिक्षिका जान्हवी बनकर यांनी केले.







