| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण पंचायत समितीच्या सहाय्यक गट विकास अधिकारी पदी एस. डी. डाबेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उरण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी हे पद रिक्त झाले होते. या पदावर उरण पंचायत समितीचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डाबेराव यांना पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांची नियुक्ती उरण पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी पदी करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्विकारून कामकाजाला सुरुवात केली आहे. पेण, उरण, चिरनेर, मुरुड या ठिकाणी त्यांनी पशुधन पर्यवेक्षक, त्यानंतर सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून 27 वर्ष त्यांनी सेवा बजावली. सहाय्यक पशुधन अधिकारी म्हणून आपली सेवा बजावताना, येथील पशुधन सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन, त्यांना नेहमीच मार्गदर्शन करून सहकार्य केले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर, विस्तार अधिकारी विनोद मिंडे, उरणचे पशुधन विकास अधिकारी श्री भोजने, उरण पंचायत समितीचे कर्मचारी जितेंद्र चिर्लेकर,डॉ. सावंत डॉ. शिंदे तसेच तालुक्यातील ग्रामसेवक या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.







