एसडी शुटर संघाची नेरळ नाईट रायडर्सवर मात

। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ ग्रामीण कबड्डी प्रीमियर लीगचे आयोजन नेरळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात 19 ते 20 मे रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एसडी शुटर कबड्डी संघाने नेरळ नाईट रायडर्स संघावर मात करीत ग्रामीण प्रीमियम लीगचा मानकरी ठरला.


नेरळ ग्रामीण कबड्डी प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाचे आयोजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष विरेंद्र जाधव यांनी केले होते. या कबड्डी प्रीमियर लीगमध्ये नेरळ लायन्स, एसडी शुटर, नाईट रायडर्स, स्व. प्रवीण पाटील प्रतिष्ठान, आर्वी शुटर, 7 स्टार वॉरिअर्स, आरवी टायगर, किंग ऑफ देवपाडा या आठ संघानी भाग घेतला होता.
या प्रीमियर लीगमध्ये सूरज डायरे यांचा एसडी शुटर संघाने उत्कृष्ट कामगिरी केल्याने नेरळ ग्रामीण प्रीमियम लीगचा मानकरी ठरला. त्यांना रोख रक्कम 51 हजार व चषक प्रदान करण्यात आला. तर, द्वितीय क्रमांक नेरळ नाईट रायडर्स संघाने पटकावला. त्यांचा रोख रक्कम 31 हजार व चषक देऊन सन्मान करण्यात आला. तृतीय क्रमांक 7 स्टार वॉरिअर्स आणि चतुर्थ क्रमांक आरवी टायगर संघाने पटकावला. त्यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तर, मॅन ऑफ द सीरिजचा मानकरी किशोर गवळी ठरला. त्याला स्पोर्ट्स सायकल व उत्कृष्ट चषक प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट पक्कड भावेश गायकर, उत्कृष्ट चढाई मयूर गवळी यांना कुलर व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे नियोजन कल्पेश पवार, दिलीप डायरे, पप्पू लोभी, गणेश चहाड, तेजश राणे यांनी केले होते. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल सुरेश टोकरे आणि विरेंद्र जाधव यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

Exit mobile version