| पनवेल | प्रतिनिधी |
खांदेश्वर पोलिसांना एक हरवलेली महिला मिळून आली असून तिच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत. सदरची महिलाही खांदेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत मिळाली असून, तिचा पत्ता तिच्या लक्षात नाही व तीचे नाव आरती जाधव (36) माहीम येथून आलेली आहे, एवढेच सांगत आहे. जर कोणी यांच्या परिचयाचे असतील तर त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश भद्रे फोन नंबर 9850641629 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







