अल्पवयीन मुलीचा सहा दिवसात शोध

| उरण । वार्ताहर ।

उरण येथील पागोटे गावातील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे (दि.26) बिहारचा तरुण जितेंद्र उर्फ जितू याने जबरदस्तीने पळवून अपहरण केल्याची तक्रार उरण पोलीसात दाखल करण्यात आली होती. आरोपीच्या मोबाईलचा तपास करीत उरण ते बेंगलोर, तमिळनाडू चेन्नई, आणि नागपूर असा रस्ते मार्गाने 2 हजार 713 किलोमीटरचे अंतर पार करून आरोपी सह मुलीला शोधून तिच्या आई वडिलांच्या ताब्यात सहा दिवसात सुखरूप परत दिली आहे. पोलिसांच्या या माणुसकीचे दर्शन या निमित्ताने झाल्याची चर्चा आहे. या गुन्हयातील अल्पवयीन मुलीची तात्काळ सुटका करणेसाठी परिमंडळ दोनचे पोलीस उप आयुक्त पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, वपोनि सुनील पाटील उरण यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे पोलीस हवालदार उदय भगत, रतन राठोड असे पोलीस पथक तयार करण्यात आले होते.

सदर पोलीस पथक चेन्नई रेल्वे स्थानक येथून 1287 किमी खासगी वाहनाने आमला रेल्वे स्टेशन येथे पोहोचून त्यांनी आरोपीचा व पीडित मुलीचा ताबा घेतला असून, सदर गुन्हा उघडकीस आणला असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version