श्रीलंकेला 24 तासात दुसरा धक्का

स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर

| कोलंबो | वृत्तसंस्था |

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 मॅचची मालिका 27 जुलैपासून सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी श्रीलंकेला दोन धक्के बसले आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला शनिवारपासून सुरुवात होत आहे. भारतीय क्रिकेट संघ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्त्वात श्रीलंकेत दाखल झाला आहे. भारतीय संघाने सराव देखील सुरु केला आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या अडचणी वाढत आहेत. श्रीलंकेचा स्टार खेळाडू वेगवान गोलंदाज नुवान तुषारा जखमी झाल्याने मालिकेबाहेर गेला आहे. तुषाराला सरावादरम्यान दुखापत झाली.

भारतानं टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्त्वात झिम्बॉब्वेचा दौरा केला होता. या दौऱ्यात भारताने 4-1 असा विजय मिळवला होता. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. टी-20 विश्वचषकमधील अपयश पुसून टाकण्याच्या इराद्याने श्रीलंकेने सराव सुरु केला होता. मात्र, श्रीलंकेला सराव सत्रात मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज नुवान तुषार याच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मालिकेबाहेर जावे लागले. अजूनपर्यंत नुवान तुषाराच्या जागी नव्या खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. त्याच्या ऐवजी दिलशान मधुशंका याला संघात स्थान दिले जाऊ शकते.

Exit mobile version