वादातील भिवंडीमध्येही उमेदवार घोषित!
| मुंबई | वृत्तसंस्था |
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या भिवंडी मधूनही उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याठिकाणी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दुसर्या यादीमध्ये सात उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये वर्धामधून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीमधून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे रिंगणात असतील, तर शिरूरमधून अमोल कोल्हे रिंगणात असतील. अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके रिंगणात असतील. दरम्यान, सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे, सातारा जागेवरील पेच सुटला नसल्याचे स्पष्ट झालं आहे. सातारमध्ये आतापर्यंत एकही उमेदवार महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही.