| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
माध्यमिक शाळा शिहूचे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शी कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे सभापती डॉ. रोहिदास शेळके यांनी भूषविले होते. वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देणारे विविध सांस्कृतिक व गुणदर्शी कार्यक्रम घेण्यात आले. तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील यशाचे कौतुक म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी शाळेला अनेक मान्यवरांकडून आर्थिक सहाय्य करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक विजयकांत पाटील, प्रमोदिनी कोकाटे, भाग्यश्री नेरपगार, साधना पाटील, भाविका म्हात्रें, भावेश कोकाटे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी रिलायन्सचे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत गोडबोले, जनार्दन शेळके, डॉ.जी. एस.कोकणे, डॉ. सुनिल पाटील, डॉ. व्ही. आर. शिंदे, के. के. कुथे, पांडुरंग गदमळे, जीवन शेळके, बा. प. पाटील, वे. सो. खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.







