। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
कामोठे सेक्टर १० मधील अंतर्गत रस्ते डांबरीकरणाबाबत सिडकोला निवेदन देण्यात आले. कामोठेमध्ये विविध सेक्टरमध्ये डांबरीकरण सुरू आहे, परंतु सेक्टर १० ला सिडकोकडून दुय्यम वागणूक मिळत आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असताना कामोठ्यामधील मुख्य रस्त्यांचे थोड्याफार प्रमाणात डांबरीकरण तसेच दुरुस्ती काम होते. पण, सेक्टर १० मधील अंतर्गत रस्ते सिडकोने कामोठे शहर बसवल्यापासून पूर्णपणे दुर्लक्षित आहेत. अशी माहिती अल्पेश धोंडिबा माने, प्रमुख शहर संघटक, शेतकरी कामगार पक्ष कामोठे यांनी दिली.
या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी ही विनंती सिडकोचे कामोठे विभाग अभियंता यांना करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद भगत, लाल ब्रिगेड अध्यक्ष कुणाल भेंडे, सेक्टर २१ युवक अध्यक्ष सुजित मुर्तुगे उपस्थित होते.