टीम इंडियाच्या सुरक्षेचा बोजवारा

| मुंबई । वृत्तसंस्था ।

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या टी-20 वर्ल्डकपच्या निमित्ताने पर्थमध्ये असून यावेळी त्याला एका धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. हॉटेलमधील काही कर्मचार्‍यांनी विराट कोहलीच्या रुममध्ये जाऊन व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर शेअर केला. यामुळे विराट कोहली संतापला असून, त्याने इन्स्टावर पोस्ट टाकून आपली नाराजी जाहीर केली आहे. दरम्यान, यानंतर खडबडून जागे झालेल्या हॉटेल प्रशासनाने संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई केली आहे.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असणारा कोहली सध्या आपल्या संघासह पर्थमधील क्राऊन टॉवर्स हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. विराट कोहली रुममध्ये नसताना हॉटेलमधील काही कर्मचार्‍यांनी आतमध्ये येऊन व्हिडीओ शूट केलं. यावेळी विराटचे कपडे, सामानालाही त्यांनी हात लावला. यानंतर त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी तसंच त्याला भेटण्यासाठी चाहते आतूर असतात, याची मला कल्पना आहे. याबाबत काहीही गैर नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून मी नाराज झालो असून माझ्या खासगी आयुष्याबाबत मी चिंतीत आहे. माझ्या स्वत:च्या खोलीमध्येही माझा खासगीपणा अबाधित नसेल, तर मग मी खासगी जागेची अपेक्षा कुठे करावी? कोणाच्याही खासगी जीवनात हस्तक्षेप करणे चुकीचे असून मला हे मान्य नाही, असं विराटने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Exit mobile version