सुरक्षारक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

खेड तालुक्यातील लोटेमाळ माळवाडी येथे एका सुरक्षारक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव सुधाकर बाळू वास्कर (65) असून, ते लोटे एमआयडीसी येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. ते लोटेमाळ माळवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहत असून रविवारी (दि. 4) सकाळच्या सुमारास त्यांनी खोलीच्या छताला असलेल्या लाकडी भालाला नायलॉन साडीने गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवला. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून वास्कर यांना दारूचे व्यसन होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

Exit mobile version