। मुंबई । प्रतिनिधी ।
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. त्यांना यापुढील काळात एक्स दर्जाची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यापूर्वी अमिताभ यांना केवळ सामान्य दर्जाची सुरक्षा दिली जात होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचे काल मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले होते.