| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमंतळाचे उद्घाटन करणार असल्याने विमानतळ परिसरात घुसखोरी होऊ नये या करता कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असे असतानाही दोन सुरक्षा भिंत ओलांडून दोन इसम विमानतळ क्षेत्रात घुसखोरी करताना कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.







