खारीचे नमुने परिक्षणासाठी रवाना

। पेण । प्रतिनिधी ।

पेण येथील प्रभात बेकरी येथील खराब खारीची तक्रार दि.24 जून रोजी नगरसेवक संतोष पाटील यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन पेण यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. त्या अनुषंगाने मा.रा. घोसलवाड यांनी 28 जून रोजी प्रभात बेकरी येथील खारीचे नमुने घेउन विश्‍लेषणासाठी पुढे पाठविले असून, त्या खारीच्या नमुन्याचे विश्‍लेषण आल्यावर बेकरीविरूध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंतर्गत पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र संतोष पाटील यांना देण्यात आले आहे. तसेच, कृषीवल प्रतिनिधी यांनी मा.रा. घोसलवाड सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, बेकरी मालकाविरूध्द कायदेशी कारवाई केली जाईल. फक्त खारीच्या नमुन्याचा रिपोर्ट येण्याची वाट बघत आहोत. तसेच, त्यांना नोटीसदेखील दिली असून बेकरीतील कामगारांबाबतदेखील विचारणा केली आहे, असे ते म्हणाले.

Exit mobile version