। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील खांब येथे बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठ अधिनस्त कृषि विज्ञान केंद्र रोहा मार्फत आणि कृषी महाविद्यालय दापोलीच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘कृषी संजीवनी’ गटातील कृषी दुतांकडून बीज प्रक्रिया प्रत्याक्षिक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.
या प्रत्याक्षिकादरम्यान कृषिदूतांनी बीज प्रक्रियेचे महत्व सांगून बीज प्रक्रिया म्हणजेच बीजांचे संरक्षण करण्याची एक पद्धत आहे, जी मुख्यतः बीजांच्या आधीच्या शेतात लागवड करण्यापूर्वी केली जात असल्याची माहिती सांगितली. ब्राइन सोल्यूशन म्हणजेच पाण्यात मिठाचे (सोडियम क्लोराइड) मिश्रण या प्रत्याशिकासाठी डॉ. पेठे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच, कृषी विज्ञान केंद्रचे डॉ. मनोज तलाठी, डॉ.जीवन आरेकर यांचे देखील मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात विभागातील महिला वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवून विविध बाबींची माहिती घेतली.