उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया काळाची गरज

| पोलादपूर | वार्ताहर |

पारंपारिक पीक पध्दतीचा अवलंब न करता आधुनिक पध्दतीने शेती करणे काळाची गरज असल्याने बियाणे उगम क्षमता वाढवण्यासाठी बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी केले.

तालुक्यातील देवपूर गोळेगणी येथे आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत ज्ञानेश्वर पवार यांच्या शेतामध्ये बीजप्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, कृषी सहाय्यक मनोज जाधव, प्रगतशील शेतकरी राजेंद्र दळवी, विजय मोरे, ज्ञानेश्वर पवार, संकेत महाडिक व शेतकरी उपस्थित होते.

पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक तालुक्यामध्ये गावोगावी राबवली जात असुन शेतकरी वर्गाला जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग काम करीत असून भात, नाचणी पिकामध्ये अन्नद्रव्याच्या उपलब्धतेचे वाढ व्हावी व पिकामध्ये रोग व कीड प्रतिबंध करणे, उत्पादन वाढीच्या दृष्टीने मोहीम सुरू असून नाचणी भात वरी या पिकावर बीज प्रक्रियेची माहिती दिली जात आहे.

तालुक्यातील ताम्हाणे, किनेश्वर, निवे, तुर्भे बी, आग्रेकोंड, महाळुंगे, साखर, नावाळे, महालगुर या गावांमध्ये कृषी सहाय्यक मार्फत कार्यक्रम घेण्यात आले. त्याकरिता कृषी सहाय्यक मनोज जाधव, चेतन लावंड, निवृत्ती बरकडे, कोमल कचरे, विकास काकड, अनिल रुपनवर, मिथुन खराडे, प्रसाद भोकरे, रविंद्र जगताप, अनिल डासाळकर, महेश कदम, अनिल वलेकर, सुषमा शेगडे, अंजुम मोमीन, राहुल पाटील हे परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version