। पनवेल । वार्ताहर ।
गुजरात वापी येथून सीबीडी बेलापूर परिसरात जाणारा पेट्रोलजन्य ज्वलनशिल द्रव्य पदार्थ भरलेला टाटा कंपनीचा टँकर तळोजा हद्दीत एका रिकाम्या जागेत पार्किंग करून या पेट्रोलजन्य ज्वलनशिल द्रव्य भेसळयुक्त करताना तळोजा पोलिसांनी व पनवेल तहसील कार्यालयाच्या पथक असे संयुक्तिक कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टँकर चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा पेट्रोलजन्य ज्वलनशिल द्रव्य पदार्थ बायोडिझेल असण्याची शक्यता असल्याने नमुने तापासणीसाठी पाठविण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास तळोजा पोलीस करीत आहेत.