| अलिबाग | वार्ताहर |
रिलायन्स फाऊंडेशन स्कूल लोधीवली मराठी माध्यमाच्या विज्ञान शिक्षिका वैष्णवी वामन मोडक यांची इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलमध्ये निवड झाली. हरियाणातील फरीदाबाद येथे आंतरराष्ट्रीय सायन्स फेस्टिवल नुकताच पार पडला. 19 वेगवेगळे इव्हेंट घेण्यात आले होते, त्यात तीनशे शिक्षक या कार्यशाळेत सहभागी झाले होते. यात महाराष्ट्रातील 25 शिक्षकांत मोडक यांची निवड झाली.
जगभरातील 23 देशांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. मोडक यांनी रासायनिक समीकरणे संतुलित करण्याचे शैक्षणिक साधन, पेशी कारखाना, घनकचर्याची विल्हेवाट यासारखे प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर गौरवले गेले. या खेरीज मोडक या होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या मार्गदर्शिका, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या परीक्षक, विज्ञान प्रदर्शनात परीक्षक अशा अनेक जबाबदार्या विज्ञान शिक्षक म्हणून पार पाडल्या. त्याच्या यशाचे कौतुक शालेय समितीचे अध्यक्ष रंगराजन, शाळेचे प्राचार्य आतिष शीरसागर, उपप्राचार्य डॉ.सुहास सबनीस, चेतना वनगे, कांचन सोरटे, रिलायन्स फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि शाळेतील शिक्षकवृंदानी अभिनंदना याचा वर्षाव केला.







