| आगरदांडा | प्रतिनिधी |
तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालकपदी अशोक जोशी व राजेंद्र पोतनीस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाच कोटी पेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणारा तालुक्यातील नामंकित मुरुड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाची निवडणूक 5 जानेवारी रोजी संपन्न होऊन या निवडणूकीत परिवर्तन पॅनलला बहुमत मिळाले होते. या संघात दोन तज्ञ संचालक पदाकरीता निवडणुक चेअरमन-अविनाश दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. तज्ञ संचालक पदा करिता अशोक जोशी व राजेंद्र पोतनीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन तज्ञ संचालक पदाकरीता एक एक उमेदवारी अर्ज आल्याने चेअरमन यांनी या दोघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. निवड झाल्याबद्दल सुपारी संघ नियंत्रण मंडळ अध्यक्ष संजय गुंजाळ व आदेश दांडेकर कडुन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी अविनाश दांडेकर, मोअज्जम हसवारे, प्रवीण चौलकर, अमोल उपाध्ये, अविनाश भगत, विनोद भगत, हाफिज कबले आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
सुपारी संघाच्या तज्ञ संचालकपदी अशोक जोशी व राजेंद्र पोतनिस यांची निवड
