संघटकपदी गायकवाड यांची निवड

। वावोशी । वार्ताहर ।

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे कार्यकर्ते अ‍ॅड. उत्तम जानू गायकवाड यांची रिपाई पक्षाच्या महाराष्ट्र युवक आघाडीच्या संघटकपदी निवड करण्यात आली. अ‍ॅड. उत्तम गायकवाड हे रायगडमधील डिकसळ, कर्जत या ठिकाणी राहत असून विभागीय अध्यक्ष, तालुका युवक अध्यक्ष व सध्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मागील 25 वर्षांपासून ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहेत. शिवाय ते पेशाने वकील असून समाजाचे विविध प्रश्‍न वकीलीच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळले आहेत. रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये फौजदारी व दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणातून त्यांनी बर्‍याच लोकांना न्याय देण्याचं काम केले आहे.

Exit mobile version