। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पियन्स 2024 स्पर्धा मुंबई येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत चॅम्पियन्स कराटे क्लबच्या खेळाडूंनी सहभाग घेऊन 12 सुवर्णपदके, 5 रौप्यपदके आणि 3 कांस्य पदके अशी एकूण 20 पदके मिळविली. त्यातील 12 सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची देहरादून येथे होणार्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता निवड झाली आहे. राष्ट्रीय कराटे स्पर्धा या (दि.8) ते (दि.11) मे दरम्यान देहरादून उत्तराखंड येथे होणार आहेत. सर्व खेळाडूंना महाराष्ट्राचे नाव उंचावण्याची एक सुवर्ण संधी मिळाली आहे.
सुवर्णपदक विजेते खेळाडू प्रसाद अवघडे, निखिल सोनकटाळे, शंतनु जाधव, हरिष सोलनकर, आदर्श गायकवाड, आदित्य धरावे, आकाश गुप्ता, काजल शिंदे, श्रावणी कोडवीलकर, पूर्वी आयरे.