कर्जतच्या कराटेपटूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

| कर्जत | प्रतिनिधी |
कर्नाटक येथे झालेल्या नवव्या रेन्बो कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत कर्जतमधील सात कराटेपटूंची मलेशिया व सिंगापूर येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंनी कर्नाटक येथे 13 पदके पटकाविली आहेत. त्यामध्ये पाच सुवर्ण, चार रौप्य, चार कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत या खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

हर्ष बडेकर दोन सुवर्ण, तन्वी बडेकर दोन रौप्य, सोहम कांबळे दोन सुवर्ण, आर्या शेलार एक रौप्य व एक कांस्य, सुजात मोरे एक सुवर्ण, भूषण बडेकर एक रौप्य व एक कांस्य, नरेश बडेकर दोन कांस्यपदके पटकावली आहेत. हे सर्व खेळाडू कर्जतमधील म्हाडा कॉलनी मिडलाईन सोसायटी सभागृहात वसंत शेट्टी, नरेश बडेकर, विशाल गायकवाड, भूषण बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.

Exit mobile version