कार्तिक, मयुर जैन यांची निवड

। नागोठणे । वार्ताहर ।

महाराष्ट्रातील उद्योजक व्यापारी व सेवा पुरवणार्‍या सर्व संघटनांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य म्हणून नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीचे सीईओ कार्तिक किशोर जैन व मयूर जैन यांची दोन वर्षांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र त्यांना नुकतेच मुंबई येथील कार्यक्रमात अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते देण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र चेंबरचे विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध फेर निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र चेंबर हे शासन दरबारी उद्योजकांच्या विविध समस्या मांडणे, प्रश्‍न सोडविणे, उद्योजकांसाठी आणि व्यापार्‍यांसाठी विविध संकल्पना राबविणे, महाराष्ट्रात नवनवीन उद्योग निर्मिती प्रक्रियेत सहभाग घेणे तसेच राज्य देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातील उद्योजकांना व्यवसाय विस्तारासाठी मदत करणे यासाठी कार्यरत आहे. आयात निर्यात करणार्‍या उद्योजकांसाठी योग्य दिशा दाखविणे आणि शासन दरबारात आवश्यक असणार्‍या कामकाजात सक्रिय सहभाग घेणे. या सर्व बाबतीत महाराष्ट्र चेंबर कार्यरत आहे. यावेळी कृषी व व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरच्या माध्यमातून आम्ही विशेष प्रयत्न करणार असल्याचे कार्तिक जैन यांनी सांगितले.

Exit mobile version