मानसी पाटीलची राज्यस्तरिय विज्ञान प्रदर्शनात निवड

| अलिबाग | प्रतिनिधी |

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे राज्यस्तरिय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यासाठी अलिबागमधील मानसी किर्तीकांत पाटील हीची निवड करण्यात आली आहे. सागरी लाटांपासून विदयुत निर्मिती या प्रयोगाचे सादरीकरण व प्रदर्शन भरविले जाणार आहे.

मानसी पाटील ही विद्यार्थीनी अलिबागमधील को.ए.सो. ॲड. नंदा देशमुख शाळेतील विद्यार्थीनी असून सध्या इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. तिचे आई, वडील क्षयरोग विभागात कार्यरत असून तालुका व जिल्हा स्तरावर झालेल्या विज्ञान प्रदर्शनासाठी पालकांकडून तिला प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे जिल्हास्तरावर झालेल्या विज्ञान प्रदर्शनात तिने द्वितीय क्रमांक मिळविला. आता तिची राज्यस्तरिय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. सावंतवाडी येथे 9 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरिय विज्ञान प्रदर्शन भरविले जाणार आहे. यामध्ये सागरी लाटांपासून विदयूत निर्मिती या प्रयोगाचे सादरीकरण ती करणार आहे. तिच्या पुढील वाटचालीस अनेकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

मानसी पाटील ही विद्यार्थीनी अलिबागमधील आहे. तालुका, जिल्हास्तरावर झालेल्या विज्ञान प्रदर्शनात तिने चांगली कामगिरी केली आहे. राज्यस्तरिय विज्ञान प्रदर्शनात तिची निवड झाली असून ती रायगडचे नेतृत्व करणार आहे. तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

कृष्णा पिंगळा
गट शिक्षणाधिकारी, अलिबाग
Exit mobile version