उपसरपंचपदी नेहा सावंत यांची निवड

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रुप ग्रामपंचायतचे रिक्त असलेल्या उपसरपंचपदी नेहा ज्ञानेश्‍वर सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. नेहा सावंत या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या असून श्‍वेता हडप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती.

नसरापूर ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच श्‍वेता हडप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त असलेल्या उपसरपंच या पदासाठी थेट सरपंच आणि पिठासिन अधिकारी जयवंती कोळंबे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी नेहा सावंत यांनी अर्ज दाखल केला होता आणि त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने उपसरपंचपदी नेहा सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी नितीन वैद्य उपस्थित होते.

Exit mobile version