अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडितशेट पाटील तसेच शेकाप जिल्हा चिटणीस, जिल्हा परिषद गटनेते ॲड. आस्वाद पाटील यांची कोकण एज्युकेशन सोसायटी अलिबाग च्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पंडित पाटील, आणि आस्वाद पाटील यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.





