| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हास्तरीय एचओसीएल रसायनी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धेत पीएनपी होली चाईल्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
या क्रिडा स्पर्धेत मुलांमध्ये तन्वेश सुधीर कडवे 400 मीटर अडथळा शर्यत प्रथम क्रमांक, बांबू उडी मध्ये द्वितीय क्रमांक तर क्रॉस कंन्ट्री स्पर्धेत सहावा क्रमांक. शिव शिवराम निर्मल याने बांबू उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले तर शौर्य देवेंद्र याने तांबोळी क्रॉस कंन्ट्री स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला. मुलींमध्ये असावरी अमोल पाटील 400 मीटर अडथळा शर्यती मध्ये प्रथम क्रमांक, बांबू उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. लावण्या अतिश पाटील बांबू उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर भाविषा अनिल टाक हिने 400 मीटर अडथळा शर्यतीमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. श्रावणी निकेत भगत क्रॉस कंन्ट्री या स्पर्धेत सहावा क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धकांची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील होली चाईल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल एसएससी बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले क्रिडा प्रशिक्षक अक्षय सदानंद डाकी व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







