| रायगड | प्रतिनिधी |
रायगडचा खेळाडू साईराज जोशी याची विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या 16 वर्षांखालील मुलांच्या संघात निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे साईराज जोशी याची 16 वर्षांखालील मुलांच्या संघात निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र आमंत्रितांच्या स्पर्धेत रायगड संघाकडून खेळताना आठ सामन्यात साईराजने 38 बळी घेतले. या चमकदार कामगिरीमुळे त्याची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली. साईराज हा डाव्या हाताने मध्यम जलद गती गोलंदाजी करतो. त्याला राजेंद्र कोंढाळकर यांच्याकडून प्रशिक्षण मिळाले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि सर्व सदस्यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
साईराजची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
