| रेवदंडा | वार्ताहर |
रेवदंडा आंग्रेनगर येथील 19 वर्षीय श्रावणी जयवंत घरत हिची इंडियन नेव्हीमध्ये जहाजावरील फायटर जेटमध्ये मिसाईल लोड करणे, उत्पादन व देखभाल विभागात एविएशन, (एअर ऑरडिनन्स) या पदावर अग्नीविर म्हणून कोची येथे कार्यरत होणार आहे. इंडियन नेव्हीमध्ये अलिबाग तालुक्यात प्रथम अग्नीवीर होण्याचा बहूमान तिने पटकाविला आहे. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण रेवदंडा को.ए.सो. माध्यमिक शाळेत तर बारावी पर्यंतचे शिक्षण को.ए.सो. अँड नंदा देशमुख अलिबाग येथे पुर्ण केले. तिने डिफेन्स एक्झाम व फिजिकल ची तयारी करत असताना पीएनपी कॉलेजमध्ये कॉम्यूटर सायन्स शाखेत प्रवेश घेतला होता.
दरम्यान, डिफेन्सची तयारी करत असताना सन 2023 मध्ये तिने इंडियन नेव्हीसाठी एसएसआरचा फार्म भरला. यानुसार इंडियन नेव्हीच्या दोन परिक्षा फिजीकल व दोन मेडिकल चाचण्यामध्ये उत्तीर्ण होऊन 27 ऑक्टोबर 2023 रोजी ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आले होते. त्यानुसार तिने चार महिन्याचे ट्रेनिंग पुर्ण करुन तिची अग्नीवीर म्हणून नियुक्ती झाली. इंडियन नेव्हीमध्ये जहाजावरील फायटर जेटमध्ये मिसाईल लोड करणे, उत्पादन व देखभाल विभागात एविएशन या पदावर नियुक्ती झाली आहे. तिच्या निवड झाल्यामुळे तिचे रेवदंडा मित्रमंडळाच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संदिप खोत, संतोष जाधव, निलेश खोत, रोहन कारेकर, संदिप मोरे, रणजीत गुरव, अरूण विचारे, आदीची उपस्थिती होते.







