| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधी प्राधिकरण मुंबई रेवती ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्लोबल फाऊंडेशन यांच्यावतीने ‘व्हीजीट माय पोलीस स्टेशन’ या उपक्रमासाठी महाराष्ट्रमधून प्रथम पोलीस आयुक्तालय ठाणे यांची निवड करण्यात आली होती.
सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांचे कामकाज, पोलीस ठाण्याविषयी असलेले गैरसमज, वगैरे इ. समन्वय साधणे व पोलीस दलाप्रती विश्वास वाढविण्याकरिता प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील प्रतिष्ठित, वरिष्ठ, सर्व पोलीस कमिटी, शाळा, कॉलेज, कलाकार, डॉक्टर अशा जास्तीत जास्त नागरिकांना पोलीस ठाणे भेट देऊन सहभागी करून माहिती देण्यात आली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ‘व्हीजीट माय पोलीस स्टेशन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. ठाणे न्यायलय येथे मा. आगरवाल, मुख्य न्यायाधीश, ठाणे न्यायालय, आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त, ठाणे शहर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक समारंभ पार पडला. ठाणे पोलीस आयुक्तालयातील कासारवडवली पोलीस ठाणेस द्वितीय क्रमांक मिळाला. यावेळी वपोनि एन.बी. कोल्हटकर यांनी स्वीकारला. यावेळी मराठी अभिनेते मंगेश देसाई हेसुद्धा उपस्थित होते.







