| कोर्लई | वार्ताहर |
गोवा येथे सुरू झालेल्या 37व्या राष्ट्रीय खेळात सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत महाराष्ट्रातील संघात रायगड जिल्ह्यातील तिघांची निवड झाली आहे. यात प्रद्युमन म्हात्रे (पनवेल) व वेदांत सुर्वे (अलिबाग) हे खेळाडू असून महाराष्ट्र संघ प्रशिक्षकपदी विजय चंद्रकांत तांबडकर (मुरुड) यांची निवड झाली आहे.
आजपासून गोवा येथे 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेची शानदार सुरुवात झाली आहे. दि.26 ते 9 नोव्हेंबर दरम्यान आयोजित या स्पर्धेत एकूण 43 खेळ व दहा हजारांहून अधिक खेळाडू भाग घेणार असून यात सिकई मार्शल आर्ट या खेळाचा समावेश आहे. सिकई असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष मजहर खान व महासचिव रविंद्र गायकी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात संघ व्यवस्थापक दिनेश राऊत, पुरुष प्रशिक्षक विजय चंद्रकांत तांबडकर, महिला प्रशिक्षक निलोफर खान यांच्यासह महाराष्ट्रतील 8 पुरुष व 8 महिला सिकईपट्टूचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यातील सिकईपट्टू वेदांत संदेश सुर्वे (अलिबाग), प्रद्युम्न अशोक म्हात्रे (पनवेल) यांच्यासह स्वयंम रविंद्र गायकी, हुजैफा शरीफ ठाकूर, बिरुदेव संभाजी पुजारी, डॉ. आनंद बाबुलाल यादव, योगेश साहेबराव वासकर, शिवराज संतोष वरघडे, तसेच महिला सिकईपट्टू आस्था रविंद्र गायकी, काजल प्रथमेश लोंढे, राधिका प्रफ्फुला गुप्ता, सारासार जुनेद फारूकी, अनिशा प्रकाश धुळधुळे, अश्विनी अंगद वागज, योगिता यशवंत खाडे, वैशाली जिजाराम बांगर यांचा समावेश आहे.